तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:20+5:302020-12-15T04:28:20+5:30
पुणे : तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून भारताची वाटचाल गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वायू वितरण करणाऱ्या कंपन्या नैसर्गिक ...
पुणे : तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून भारताची वाटचाल गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वायू वितरण करणाऱ्या कंपन्या नैसर्गिक वायूच्या वापराची मागणी पूर्ण करण्यासाठी एकप्रकारे ‘गेमचेंजर’ ठरत आहेत. नैसर्गिक वायू हे नव्या पिढीतील इंधन असल्याने यात जाणीवपूर्वक लक्ष घातले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय स्टिल, नैसर्गिक वायू व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या ५ नव्या सीएनजी केंद्राचे उद्घाटन प्रधान यांनी ऑनलाइन केले. खासदार गिरीश बापट, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, ‘एमएनजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रधान म्हणाले की, नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि मुबलक प्रमाणात नैसर्गिक वायू मिळण्यासाठी आश्वस्त केले आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. त्याचा परिणाम आपला देश हरित आणि स्वच्छ व राहण्यासाठी होणार आहे. पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, टर्मिनल, स्टेशन्स आणि पाईपलाइन यांच्या उभारणी व विकासातून हे शक्य होणार आहे.