इंडो ब्राझील एज्युकेशनल एक्सचेंज कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:11+5:302021-04-17T04:10:11+5:30
इयत्ता ८ वी आणि ९ वीतील विजय वल्लभ शाळेचे २० विद्यार्थी आणि त्याच वयोगटातील हेलेना ऍन्टीपोफ्फ ब्राझीलचे १५ विद्यार्थी ...
इयत्ता ८ वी आणि ९ वीतील विजय वल्लभ शाळेचे २० विद्यार्थी आणि त्याच वयोगटातील हेलेना ऍन्टीपोफ्फ ब्राझीलचे १५ विद्यार्थी सहभागी झाले. सातत्यपूर्ण आभासी बैठकांच्या माध्यमातून,३ ते ४ महिने प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी भारतीय वेळेनुसार ४ .३० वाजता भेटत असत.
पहिल्याच बैठकीत ब्राझील आणि भारतीय विद्यार्थ्यांनी स्वतःची आणि आपल्या सहाध्यायी मित्रांची ओळख करून दिली.
खेळ आणि उपक्रमातून विद्यार्थी हळूहळू खुलू लागले, एकमेकांना उलगडू लागले. इंटरनेटवर मिळणारी डिजिटल ध्वनिफीत (पॉडकास्ट) व टेलेंट शो ह्या दोन प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येईल असे ठरले. विजय वल्लभच्या विद्यार्थ्यांनी ब्राझीलच्या आपल्या मित्रमैत्रिणींना ध्यानधारणा करायला शिकविले. त्यांच्याशी शिक्षणपध्दतीवर चर्चा केली. त्यातूनच भेट झाली ती सॅम गोदार्द ह्या यूके (इंग्लंड)च्या फोरेस्ट स्कूलचे संस्थापक यांची आणि दोन्ही देशांच्या किशोरवयीन मुलांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी मारुलकर यांनी उत्तेजन दिले. तर या प्रकल्पाच्या समन्वयक प्रगती जोशी आणि शाळेतील इंग्रजीच्या शिक्षिका नसरीन खान आणि कियारा ठक्कर यांनी मार्गदर्शन केले.