इंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार, रविवारी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 08:42 PM2019-04-04T20:42:55+5:302019-04-04T20:43:08+5:30
दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.
पुणे : दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी पुणे ते सोलापुरदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द केली आहे. तसेच ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे.
ब्लॉकमुळे सोलापुर ते पुणे डेमु गाडी प्रत्येक शनिवार व रविवारी कुडुर्वाडीपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे पुणे-सोलापुर डेमु गाडी भिगवणपर्यंत सोडणार आहे. पुणे ते हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी दर शनिवारी पुणे ते कुडुर्वाडीपर्यंत रद्द केली असून ही गाडी कुडुर्वाडी स्थानकातून नियमित वेळापत्रकानुसार धावेल. तसेच ही गाडी सोमवार व बुधवारी वेळापत्रकानुसार पुण्यातून सुटेल. हैद्राबाद-पुणे गाडीही दोन दिवस कुडुर्वाडीपर्यंत धावणार आहे.
भुसावळ स्थानकावरही ६ ते १९ एप्रिलदरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अजनी-पुणे एक्सप्रेस १६ एप्रिल रोजी, पुणे-अजनी एक्सप्रेस १९ एप्रिल रोजी, पुणे-अमरावती एक्सप्रेस १७ एप्रिलला, अमरावती-पुणे एक्सप्रेस १८ एप्रिलला रद्द केली आहे. त्याचप्रमाणे पुणे-नागपुर व नागपुर-पुणे एक्सप्रेस अनुक्रमे १८ व १९ एप्रिल आणि हबीबगंज-धारवाड-हबीबगंज एक्सप्रेस ही गाडी १९ व २० एप्रिल रोजी धावणार नाही. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १९ एप्रिलपर्यंत पुणे ते नाशिक रोड स्थानकापर्यंत व भुसावळ-पुणे एक्सप्रेस २० एप्रिलपर्यंत भुसावळ ते नाशिक रोड स्थानकांपर्यंत धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली. इंद्राय