इंद्रायणी नदीने काठ सोडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:18 AM2018-07-09T01:18:44+5:302018-07-09T01:19:11+5:30

मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे.

 Indrayani river Flood | इंद्रायणी नदीने काठ सोडला...

इंद्रायणी नदीने काठ सोडला...

Next

आळंदी - मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे. नदीत पोहण्याचा हट्ट न करण्याचे आळंदी पालिकेच्या प्रशासनाने आवाहन केले आहे.
पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर भाविकांच्या दर्शनास बंद झाले असून भक्ती सोपान पुलावरून पाणी जात असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. नदीलगतच्या पाण्याखाली गेलेल्या किनाऱ्याजवळून जातांना नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिल्या आहेत. पुराचे पाणी पाहण्यास परिसरात गर्दी होत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा रस्ते आणि भक्ती सोपान पूल वापरास तात्पुरता बंद झाला आहे. लगतच्या पूर्व किनाºयावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे.
इंद्रायणी नदीदर्शनास भाविक आणि नागरिक, शालेय मुले, प्रवासी गर्दी करून पावसाचा आनंद लुटत आहेत. इंद्रायणी नदीवरील पाचही पुलांवर थांबल्यानंतर इंद्रायणीला आलेला पूर पाहता येत असल्याने नदीचे दुतर्फा विहंगम दृष्य नेत्रात साठविण्यास भाविक जमत आहेत. माऊली मंदिर आणि इंद्रायणी नदीघाट वैभव, तसेच श्री ज्ञानेश्वरी मंदिर, विश्वरूपदर्शन मंच, गरुडस्तंभ, नव्याने विकसित झालेला पाचवा पूलदेखील परिसरातील नागरिकांचे प्रवाशांचे लक्ष वेधत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी पुलावर वाहने थांबवून वाहनचालकदेखील दिसत होते. इंद्रायणी नदीवरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरासह भागीरथी कुंडात पुराचे पाणी साचले आहे. यामुळे भागीरथी कुंडही पाण्यात
गेले आहे.

नदीकाठच्या गावांना इशारा

मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाचे आळंदीतून वाहणाºया इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी नदीपात्रात वाढत आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाने भाविकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून नागरिक पाण्यात स्नानासाठी जात आहेत. या परिसरातील पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरता अनेक जण नदीपात्रात दूरवर स्नानास जाताना दिसत होते. आपत्ती निवारण यंत्रणेने नदी परिसरात दक्षता घेऊन पोहण्यास जाणाºया नागरिकांना, युवकांना, भाविकांना रोखण्याची मागणी नागरिकच करीत आहेत. आषाढी यात्रेच्या प्रस्थान काळात दोन जणांना पुरात वाहून जाताना वाचविण्यात आल्याची घटना ताजी असताना आळंदीतील नदीपात्रात पुराच्या पाण्यात पोहण्यास जाणाºयांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:  Indrayani river Flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.