कोविड सेंटरच्या मदतीला धावले औद्योगिक कारखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:16+5:302021-05-23T04:11:16+5:30
इंडस्ट्रियल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य भेट दिली. गेल्या महिनाभपासून ...
इंडस्ट्रियल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य भेट दिली.
गेल्या महिनाभपासून पिंपळे जगताप याठिकाणी श्री क्षेत्र वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी आमदार अॅड. अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरची पिंपळे जगताप येथील मयुरी लॉन्स या मंगल कार्यालयात निर्मिती केली. या सेंटरमधून औषधोपचारातून बरे झालेल्या रुग्णाला वृक्ष भेट देण्याचा सामाजिक उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.
ज्या रुग्णांना बाहेरील औषध द्यावयाची असतात, अशा रुग्णांना प्रफुल्ल शिवले स्वत: औषधे देत असतात. ही गरज ओळखून परिसरातील इंडस्ट्रियल मेटल पावडर (आयएमपी) या कारखान्याच्यावतीने कारखान्याचे प्रकाश धोका यांनी बहुतांश औषधे कोविड केअर सेंटरला भेट दिली. याचेच अनुकरण करत आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्याच्या वतीने याठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक यांच्यासाठी ग्लोज व मास्क उपलब्ध करून दिले आहे. यावेळी प्रफुल्ल शिवले यांच्या समवेत अंकुश शिवले, संदीप शिवले, प्रसाद शिवले, गणेश कर्डिले, लक्ष्मण शिवले, अक्षय शिवले, विठ्ठल शिवले आदी उपस्थित होते.
--
चौकट
सीटी स्कॅन आता दीड हजारात
पिंपळे जगताप (चौफुला) व शिक्रापूर येथे ३०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना सीटीस्कॅनची गरज असते व सध्याच्या काळातील आर्थिक मंदीमुळे हे दर रुग्णांना परवडणारे नसल्याने आमदार अॅड. अशोक पवार चौफुला कोविड सेंटरचे चालक प्रफुल्ल शिवले यांच्या समवेत सूर्या हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र टेमगिरे यांची भेट घेत आमदार पवार यांनी सीटीस्कॅनचे दर कमी करण्याची सूचना करताच सर्व कोविड रुग्णांसाठी सीटीस्कॅनचे दर प्रती रुग्णांना दीड हजार केल्याने येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
--
फोटो क्रमांक - २२ कोरोगाव भीमा कोरोना सेंटर
फोटोओळी : चौफुला (ता. शिरूर) येथील कोविड केअर सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल मेटल पावडर व आर्सेलर मित्तल अँड निपॉन स्टील या कारखान्यांनी औषधे व इतर साहित्य प्रफुल्ल शिवले यांच्याकडे भेट दिली.