उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

By admin | Published: July 8, 2016 04:04 AM2016-07-08T04:04:26+5:302016-07-08T04:04:26+5:30

शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या

Industrialization is criminal | उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

Next

- सचिन देव, पिंपरी

शहरात गुन्हेगारांच्या नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत २२ खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ४२ घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक खून पिंपरीत ५, हिंजवडीत ५ आणि वाकड व निगडीत प्रत्येकी तीन खुनाच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी पोलीस ठाण्याशेजारीच एका युवकाचा कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळ्क्यांनी खून केला. थेट दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा वचक संपला असून, गुन्हेगारांची दहशत वाढल्याची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर पुन्हा पिंपरीतच मिलिंदनगरात चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला . यानंतर मागील आठवड्यात सांगवी येथे तीन जणांनी एका युवकाला रात्री साडेअकराला रस्त्यात अडवून कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि आता दोन दिवसांपूर्वीच पुन्हा चिंचवड येथे पादचाऱ्यांना लुटण्याचा प्रकारही घडला असून, या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही.
या घटनांचा आलेख दिवसागणिक वाढत असून, गेल्या सहा महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत २२ खुनाच्या घटना घडल्या आहेत. खुनाचा प्रयत्न करण्याच्याहीं घटना हिंजवडी, वाकड आणि निगडी येथे प्रत्येकी ६ घटना घडल्या आहेत. अशा प्रकारे या गंभीर गुन्ह्यांचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत असताना घरफोडी, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, रस्त्यात अडवून लूट करणे या घटनांचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे. चार दिवसांपूर्वीच नेहरुनगरमध्ये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका पादचारी महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली. तर दोन दिवसांपूर्वीच सोमवारी (दि. ४) रात्री भोसरी येथे चोरट्यांनी वाइन्स शॉपचे दुकान फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास केली आहे. दरम्यान , दुचाकी चोरीच्या घटनांचा क्रम तर नित्याचाच झाला असून, दर दिवसाआड पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होत आहेत. दुचाकी चोरीच्या घटनांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही बोटावर मोजण्या इतकेच आहे.

गुन्ह्यांमध्ये युवक आघाडीवर
शहरात घडलेल्या मागील खुनाच्या घटना, तोडफोडीचे प्रकार आणि घरफोडीच्या घटनांमध्ये अटक केलेल्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे सोळा ते पंचवीस वयोगटातील आहेत. यामध्ये काही सराईत गुन्हेगार असून, काही युवक हे गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसतानाही दहशत माजविण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर दुचाकी चोरी व सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील अटक केलेल्या चोरट्यांमध्येही बहुतांश चोरटे हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तर काही चोरटेही नवनवीन टोळ्यांमध्ये काम करत असल्याचे समोर आल्याने यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.


पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह युवकांचा समावेश आढळून आल्याने, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पोलिसांतर्फे या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. मात्र, आई -वडिलांनीही या गोष्टीचा गंभीर विचार केला पाहिजे. अठरा ते पंचवीस हा करिअर घडविण्याचा कालावधी असल्याने, युवकांचे यांकडे लक्ष नसून किरकोळ कारणावरून खुना सारख्या घटना युवकांच्या हातून घडत आहेत. याकरिता आई-वडिलांनी आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, त्याला काही व्यसन आहे का, तो शाळेत जातो का, यांकडे लक्ष देऊन, त्याला दुष्परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे. शहरातील सामाजिक संस्थानींही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच सुसंस्कृत युवक तयार होतील.
- पी. आर. पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे

Web Title: Industrialization is criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.