संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:33+5:302021-08-15T04:12:33+5:30

कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा; विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना बारामती: शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या ...

Infection rate 5 percent | संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या

संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या

Next

कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा; विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

बारामती: शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात कोरोनासंसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या पुढे वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील म्हणून सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढता कामा नये. टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरू आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजनचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच मॉल मध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा, लसीकरणांचे नियोजन व्यवस्थित करावे, पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या, बारामतीमध्ये एमआयडीसीमधील कंपन्यांनी, तसेच व्यापारीवर्गांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून बारामती शहरात, तसेच ग्रामीण भागात सोयी-सुविधा उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेडच्या व्यवस्था सुनिश्चित कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत, तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, ख्रिश्चन कॉलनी येथील कॅनलवरील ब्रिजचे काम, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभीकरण, क्रीडा संकुल, ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत, बारामती कुस्ती केंद्र व पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

चौकट........

बैठकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळ आणि पांडुरंग प्रतिष्ठान गोकुळवाडी व नगरपरिषद सदस्य अनिता गायकवाड यांच्या सहकार्याने दीड लाखाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. या मदतीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. तसेच, तुकाराम भापकर प्रतिष्ठान, पुणे व सायंबाचीवाडी यांच्या वतीने एनव्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायत यांच्यावतीने लावण्यात आलेल्या झाडांना पाणी पुरविण्यासाठी ५ पाण्याचे टँकर, तसेच यादगार सोशल फाऊंडेशन, बारामती यांच्या वतीने ५ आर.ओ. प्युरिफायर व १ हजार लिटर पाण्याच्या पाच टाक्या दर्गा मशिद, सिध्देश्वर मंदिर, महिला ग्रामिण रुग्णालय, बारामती शहर पोलीस ठाण्याला यांना व पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशन यांच्या वतीने १ लाख रुपयाचा धनादेश कोविडसाठी मदत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

बारामती शहर परिसरात सुरू असलेल्या नीरा डावा कालवा सुशोभीकरण व दुरुस्तीच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.

१४०८२०२१-बारामती-०७

Web Title: Infection rate 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.