टोमॅटो, मेथी, वांगी यांची आवक स्थिर
By admin | Published: April 19, 2017 04:10 AM2017-04-19T04:10:42+5:302017-04-19T04:10:42+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा यांची आवक स्थिर झाली असून बाजारभाव स्थिर राहिले
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा यांची आवक स्थिर झाली असून बाजारभाव स्थिर राहिले. तसेच कारली, भेंडी, गवार, काकडी, दोडका यांच्या आवकेत घट होऊन बाजारभाव
तेजीत आले. हरभऱ्याच्या
आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत होते. ज्वारी आणि मक्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव स्थिर होते. दरम्यान, लिंबाच्या आवकेत वाढ झाली असून
बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती रामभाऊ चौधरी, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (४७) ६०-१२०, वांगी (३१) ८०-१८०, दोडका (५) २००-३५०, भेंडी (१५) १५०-३००, कारली (६) ३००-४००, हिरवी मिरची (२५) २०० ते ३७०, गवार (३) ३०० ते ५००, भोपळा (३४) ३५ ते ६०, काकडी (२६) १०० ते १८०, कोथिंबीर (६४३० जुड्या) ३०० ते ९००, मेथी (२५१० जुडी) २५०-५००.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (२१०५) १६२५ ते १९५०, ज्वारी (१०७६) १८०० ते २५००, बाजरी (२८६) १२५० ते २१००, हरभरा (३४६) ५२०० ते ५४५०, मका लाल/पिवळा (४८) १३०० ते १४५०, तूर (५२) ३७००-३९००, लिंबू (१३६) ५०० ते ८०१.
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (१३१) १५४१ ते २०००, ज्वारी (१८) १७५१-२४५१, बाजरी (३४) १२०० ते १८००, हरभरा (२८) ५००० ते ५५५१, मका (१४) १२०० ते १३५१, तूर (३) ३५२५-३५२५.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (२३९) १५८० ते २१००, ज्वारी (१९) १८०० ते २५००, बाजरी (२५) १३५१ ते २०००, हरभरा (१०) ५४०० ते ५४००, लिंबू (१२३) ६०० ते १०००. (वार्ताहर)