वैदवाडी परिसरात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव, पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:56+5:302021-06-10T04:08:56+5:30
या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांना काय उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती देऊन ...
या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांना काय उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती देऊन नारायणगाव येथील कृषी शास्त्रज्ञ त्यांना या ठिकाणी येऊन भेट देण्यास कळवले आहे.
मारुती बढेकर यांची शेती वैदवाडी, पोंदेवाडी सीमेवर असून या परिसरामध्ये असणाऱ्या फॉरेस्टमधून रात्रीच्या वेळेस हजारोच्या संख्येने शंखी गोगलगाय शेतातील कोवळ्या कोबी, फ्लॉवरसारख्या पिकांवर हल्ला करून पिके नष्ट करत आहेत व ऊन आल्यावर जवळच असणाऱ्या फॉरेस्टमध्ये निघून जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आत्तापर्यंत बडेकर या शेतकऱ्याने हजारो गोगलगाय वेचून नष्ट केल्या, मात्र तेवढ्याच प्रमाणात पुन्हा गोगलगाई शेतात येत आहेत. मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टी, वादळे, कोरोना यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना आता आलेल्या या शंखी गोगलगायमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यावर उपाययोजना केली नाही तर मोठ्या प्रमाणावर शंखी गोगलगाय निर्माण होऊन या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो असे मारुती बडेकर यांनी सांगितले. या वेळेस उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, मंडल कृषी अधिकारी संजय घुले, कृषी सहाय्यक प्रवीण मिरके,संजय बढेकर यांनी भेट दिली.