लसीकरणासाठी महानगरातील माणसांची गावात घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:26+5:302021-05-08T04:12:26+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभेसारख्या दुर्गम भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करत ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभेसारख्या दुर्गम भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील लोक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. पुणे, मुंबई, पिंपरी, चिंचवडसारख्या शहरांमध्ये लसीकरणासाठी दिवस-दिवस रांगेत उभे रहावे लागते. टोकण काढावे लागते व एवढे करूनही लस मिळेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे शहरी भागातील लोकांना लसीकरणासाठी तीन ते चार दिवस लसीकरणासाठी जात आहेत. यावर शहरातील लोकांनी युक्ती सुचवली असून लसीकरणाचे केंद्र हे ग्रामीण भागातील निवडत आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयामध्ये लस उपलब्ध असल्यामुळे लस लवकर मिळते हे शहरी भागातील लोकांना सोपे जात आहे.
मात्र शहरातील नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण रांगेत उभे रहावे लागत आहे. प्रसंगी दिवसाचा कोटा संपल्यावर त्यांना लस मिळण्यास विलंब होत आहे. शहरातून येणाऱ्या लोकांमुळे सुपरस्प्रेडर निर्माण झाल्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय गावातील लोकसंख्येच्या दृष्टीने गावात उभी असलेल्या आरोग्य यंत्रणा मर्यादित आहे. मात्र, अचानक इतके मोठी गर्दी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण पडला आहे.
--
चौकट
रहिवासी असलेल्या परिसरातच लसीकरण व्हावे
शहरातील नागरिकांचे ग्रामीण भागात येऊन लसीकरण करण्यासाठी त्यामुळे गावातील नागरिकांचे लसीकरण होणे लांब पडते, मात्र गावातील आरोग्य बिघडत आहे. शिवाय लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या रहिवासी परिसरातीलच लसीकरणावर लस द्यावी किंवा स्थानिक नागरिकांसाठी राखीव वेळ ठेवावी व बाहेरील नागरिकांसाठी मर्यादित वेळापत्रक करावे. त्यामुळे स्थानिक व बाहेरील व्यक्तींची एकाचवेळी गर्दी टळेल.