महिलांच्या डब्यात घुसखोरी करणे ४०० जणांना महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 07:04 PM2020-01-11T19:04:49+5:302020-01-11T19:10:52+5:30
मागील वर्षभरात त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल
पुणे : रेल्वेगाड्यांमध्येमहिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये घुसखोरी करणे ४०० हून अधिक पुरूष प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे. मागील वर्षभरात त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाकडून आता महिला सुरक्षेसाठी लांबपल्याच्या गाड्यांमध्येही महिला कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती ‘आरपीएफ’कडून देण्यात आली.
रेल्वेगाड्या तसेच स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आरपीएफ च्या खांद्यावर असते. त्यानुसार आरपीएफकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. पुणे-लोणावळा लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनेकदा पुरूष प्रवासी घुसखोरी करतात. याबाबत अनेकदा तक्रारी आल्याने मागील काही महिन्यांपासून आरपीएफकडून या डब्यांमध्ये दोन महिला कर्मचाºयांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घुसखोर पुरूष प्रवाशांना पकडून कारवाई केली जात आहे. २०१९ या वर्षात अशा ४०२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६२ हजार १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आरपीएफ’कडून पुणे विभागामध्ये असुरक्षित ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळी असुरक्षित दररोज २९ लांबपल्याच्या गाड्या व ६ लोकल गाड्यांमध्ये गस्त घातली जाते. लांबपल्याच्या गाड्यांमध्ये सध्या एक पुरूष अधिकाºयासह तीन कर्मचारी असतात. या गाड्यांमध्ये त्यांच्यासोबत महिला कर्मचारी देण्याचा विचारही आरपीएफकडून केला जात आहे. यांसह महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती ‘आरपीएफ’कडून देण्यात आली.