महागाईनेसर्वसामान्य माणसाला आणले जेरीस चार महिन्यात गॅसच्या दरात तब्बलदीडशे रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:51+5:302021-02-13T04:11:51+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य माणसाला घरगुती गॅसच्या दरवाढीचाही फटका बसत आहे. मागील चार महिन्यांत ...
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य माणसाला घरगुती गॅसच्या दरवाढीचाही फटका बसत आहे.
मागील चार महिन्यांत गॅसच्या तब्बल दरात दीडशे रुपयांची वाढ झाली आहे.त्यात घरगुती वापरासाठीच्या १४.२ गॅस सिलेंडरचाही समावेश आहे.लॉकडॉउनमुळे बिघडलेली घडी बसवताना सर्वसामान्य जनतेला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे.त्यात महागाई वाढत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.
नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ५९५ रुपयांना होता, तोच आता ७४५ रुपयांना मिळत आहे.
राज्य शासनाने दुर्लक्ष
आजच्या घडीला सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे सोडून सरकार महागाईच्या खाईत लोटत आहे.वाढत्या महागाईने हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. - संतोष घनवट.
* दरवाढ गरजेची -
अनेक जण महागड्या गाड्या व मोबाईल वापरू शकतात तर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती स्वीकारणे गरजेचे आहे. यातून सरकारला महसूल मिळतो मग यातूनच विकासकामे केली जातात. - रोनक विनोद गोरे.
* आर्थिक घडी विस्कटली -
रोजच्या मजुरीत वाढ झालेली नाही, मात्र घर चालवण्यासाठी लागणाऱ्या तेल,धान्य व डाळी यांच्या किमतीत रोज वाढ होत आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना घर चालवणे कठीण झाले आहे.
- रंजना फुलारे.
१ नोव्हेंबर - १ डिसेंबर - १ जानेवारी - १ फेब्रुवारी
* पेट्रोल (प्रतिलिटर दर) - ८९.८७
९२.२१
९२.५३
९६.०३
* डिझेल (प्रतिलिटर दर) - ७७.७७
७९.९३
८१.४३
८४.१७
* गॅस सिलेंडर (दर) - ५९५
६३०
७२०
७४५