महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:24+5:302021-09-08T04:14:24+5:30
(स्टार ११४९ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाकाळात महागाई वाढल्याने स्वयंपाकघरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. नेमकी सणवाराच्या ...
(स्टार ११४९ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात महागाई वाढल्याने स्वयंपाकघरातील खर्च जवळपास दीडपट झाला आहे. नेमकी सणवाराच्या काळात दरवर्षी खाद्यतेल, भुसारचे भाव कसे वाढतात, असा प्रश्न सर्वसामान्य गृहिणींना पडला आहे. यंदाच्या वर्षी तर दरवाढीचा कहर झाला आहे. खाद्यतेलाचे दर दुपटीहून वाढले आहेत, तर गॅसचे दर महिन्याला वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत गॅसचे दर ७५ रूपयांनी वाढले आहेत. साखरेचे दरही ३८-४२ किलोपर्यंत पाेहोचल्याने सर्वसामान्य कुटुंबांना घरसंसार चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
सध्या प्रत्येक वस्तूंचे भाव वाढत आहे. मागील काही दिवसांत शेंगदाण्याचे दर १५ ते २० रूपयांनी वाढले आहेत. तेल, साखर, गॅस या प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आहेत. सोबतीला आता पेट्रोल, डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहे. दैनंदिन भाजीपाला, फळभाज्या आवश्यक आहे. या सर्वांचे दर सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य दुर्लक्ष करत असल्याचे गृहिणींचे मत झाले आहे.
-----
* तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च
वस्तू तीन महिन्यांपूर्वीचा खर्च वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)
खाद्य तेल (६ लि.) ६६० १२०
धान्य (२० किलो) ५०० १००
शेंगदाणे (किलो) १०० २०
साखर (६ किलो) २०४ ३६
साबुदाणा (२ किलो) ९० २०
चहापूड (अर्धा किलो) १५० ३०
डाळ (१ किलो) ८० १५
गॅस सिलिंडर टाकी ८१२ ७५
पेट्रोल (एका गाडीला २० लि.) २१०० १००
एकूण ४६९६ ५१६
---
...अशी वाढली महागाई
जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रति किलो रूपयांत)
शेंगदाणा तेल १२० १४०-१७५
सोयाबीन तेल ९०-९५ १२०-१३०
शेंगदाणे ९०-९२ १००-१२०
साबुदाणा ५०-५२ ५५-६०
साखर ३०-३४ ३६-४०
मसाले २८० ३२०
चहापूड ३२० ३६०
तूरडाळ ७५-८० ९०-९५
मूगडाळ ७०-७५ ८५-९०
उडीद डाळ ८०-८५ ९०-१००
हरभरा डाळ ८०-८५ ९०-१००
-----
* सिलिंडर हजाराच्या घरात
मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सिलिंडरच्या भावात वाढ होत आहे. जुलै महिन्यात ८३७ रूपये, ऑगस्टमध्ये ८६२ रूपये तर सप्टेंबर महिन्यात ८८७ रूपये एका सिलिंडरचे दर झाले आहेत. म्हणजे मागील तीन महिन्यांची परिस्थिती पाहता दर महिन्याला २५ रूपयांनी गॅस सिलिंडर महागला आहे. सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे आता सिलिंडर हजाराच्या घरात पाेहोचेल.
----
कोट
श्रावण महिन्यातील उपवासामुळे शेंगदाणा-साबुदाणाला मागणी असते. आठ दिवसांत साबुदाणाच्या भावातही २ रूपयांनी शेंगदाण्याच्या भावात किलोमागे १५ ते २० रूपये वाढ झाली आहे. सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गरिबांचे जगणे अवघड होत चालले आहे.
- अनिता कदम, गृहिणी