महागाई वाढली, तरी राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरही ट्रॅव्हल्सची नाही भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:03+5:302021-08-21T04:15:03+5:30

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा घटली. पेट्रोल व ...

Inflation rises, no fare hike on travel despite Rakhi Purnima | महागाई वाढली, तरी राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरही ट्रॅव्हल्सची नाही भाडेवाढ

महागाई वाढली, तरी राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरही ट्रॅव्हल्सची नाही भाडेवाढ

Next

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा घटली. पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने विविध क्षेत्रांतील महागाई वाढली. एसटी बसेसचे तिकिटांचे दर वाढले. त्यामुळे खासगी, आरामबसेसच्या तिकिटांमध्येही वाढ होईल असे वाटत होते. मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने भाव वाढ करण्यात आली नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सांगितले.

शहरातून कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड, बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद आदी शहरांमध्ये सेवा देण्यासाठी ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनामुळे या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. ३० ते ४० टक्के प्रवासीसंख्या अद्याप कमी असून, त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे व्यवसाय आधीच कमी झाला आहे. सणासुदीच्या काळात तरी व्यवसाय वाढेल असे वाटेल होते. मात्र दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आणि यंदा धंदा मंदावला आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

या मार्गावर ट्रॅव्हल्सचे भाडे

आधीचे भाडे आता

पुणे - कोल्हापूर २५० - ३००

पुणे - सांगली २५० - ३००

पुणे - मुंबई ३०० -३५०

पुणे - नागपूर ८००- १०००

पुणे - लातूर ३००- ३५०

पुणे- सातारा २५० - २५०

पुणे - सोलापूर ३००- ३००

कोट

डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ

रक्षाबंधनला खूप गर्दी असायची. डिझेल किमती वाढल्याने परवडत नाही. त्या तुलनेत भाडेवाढ झालेली नाही. अजूनही प्रवास करायला लोक घाबरत आहेत. दोन दिवस राहिले तरी गर्दी नाही. ४५ पैकी २२ सीटच भरले आहेत.

- विजय काळे, वाहनचालक.

ट्रॅव्हल्सची संख्या घटली

बऱ्याच गाड्या बंद आहेत. दिवसात तासाला गाड्या जात होत्या. मात्र आता दिवसातून किमान दोनच वेळा गाडी सोडावी लागत आहे. गाडीचा धंदा केवळ आशेवर राहिला आहे. आज किंवा उद्या तरी धंदा होईल अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनचे नियम पाळून दिवसाला पाच ते सात गाड्या सोडल्या जात होत्या. दुसऱ्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्या दोनवर आली होती.

Web Title: Inflation rises, no fare hike on travel despite Rakhi Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.