आळेफाटा उपबाजारात संकरित गाईंची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:32+5:302021-08-20T04:14:32+5:30
जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार आवारात १९९६ सालापासून दर गुरुवारी भरणारा संकरित गाईंच्या आठवडे ...
जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार आवारात १९९६ सालापासून दर गुरुवारी भरणारा संकरित गाईंच्या आठवडे बाजारात प्रतवारीच्या चांगल्या संकरित गाई मिळतात. या बाजारात व्यापारी तसेच शेतकरी गाई विक्रीस आणतात. प्रतवारीच्या चांगल्या दुधाळ गाई मिळत असल्याने जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरी येथे गाई खरेदी करण्यासाठी नेहमी आवर्जून येत असतात. यामुळे येथे गाईंची आवक चांगल्या प्रमाणात होत असते. गुरुवारी जवळपास ३४६ गाई येथे विक्रीस आल्या, तर प्रतवारीप्रमाणे २० ते ९० हजार रुपयांपर्यंत विक्री झाली अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे व सचिव रूपेश कवडे यांनी दिली. तर यामध्ये ९४ संकरित गाईंच्या कालवडींचीही विक्री झाली.
आळेफाटा येथील संकरित गाईंचे बाजारात मेसागर गुजरात येथील हेमल पटेल हे संकरित गाई खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी १० गाई खरेदी केल्या. शेतकरी येथे गाई विक्रीस आणत असल्याने त्यांच्याकडील गाई चांगल्या प्रतीच्या असल्याने येथे गाई खरेदी करण्यास आल्याचे पटेल यांनी सांगितले.
१९ आळेफाटा
190821\20210819_100848.jpg
आळेफाटा उपबाजार आवारात भरलेला संकरित गाईंचा आठवडे बाजार.