भिलारेवाडीत रस्त्यांवर तसेच बेकायदा बांधकामांचे पेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:21+5:302021-03-22T04:10:21+5:30
.................................... अतिक्रमण निर्मूलनाचे आव्हान ..................................,,..... दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भिलारेवाडीत रस्ते चांगले आहेत, मात्र त्यांच्यावर अतिक्रमण ...
....................................
अतिक्रमण निर्मूलनाचे आव्हान
..................................,,.....
दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भिलारेवाडीत रस्ते चांगले आहेत, मात्र त्यांच्यावर अतिक्रमण झाले आहे. इतकेच नव्हे तर नियम न पाळता बांधकामे होत असल्याने भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे.
गावातील अंतर्गत रस्ते उत्तम असून विविध गल्लीबोळांतही कॉंक्रिटचे रस्ते झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा विषय गावासाठी महत्त्वाचा नसला तरी वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय असल्याचे गावकरी सांगतात. आता महापालिकेत गाव जात असताना अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांना वेग आला असून ठिकठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे या भागात कात्रज, धनकवडीची पुनरावृत्ती होऊ शकते.
नागरीकरण वाढत असताना अनेक ठिकाणी इमारती एकमेकांना खेटून बांधल्या गेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा रुग्णवाहिका आत जाणार कशा, असा सवाल गावातील नागरिकांनी विचारताच तसेच महापालिकेने शिस्त लावावी अशी अपेक्षा व्यक्त करतात.
गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने जेष्ठ नागरिकांची आबाळ होत आहे, त्याचबरोबर सोय म्हणून विरंगुळा केंद्र नाही, तसेच व्यायामशाळेची सुविधा नसल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाकाळात गावात योग्य वेळी योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या गेल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला होता. पण आता कोरोनाचा ज्वर पुन्हा वाढत असल्याने आता महापालिका आणि ग्रामपंचायत कशी पावलं उचलणार याविषयी गावकऱ्यांमध्ये साशंकता आहे.
टाळेबंदीत, गावातील छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यासंदर्भात काही मदत किंवा विशेष योजनेद्वारे त्याची भरपाई न झाल्यामुळे गावातील छोट्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
__________________________________
गावात आलेल्या महापुरात काही ठिकाणी ड्रेनेजची पाईप वाहून गेले होते, तर काही ठिकाणी ते जोडलेले नसल्याने दुर्गंधी येते. महापालिकेने ड्रेनेजबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावीत.
- सोपान दगडू भिलारे,
जेष्ठ नागरिक
_________________________
गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेने प्राधान्य द्यावे.
- अनिल कदम, नोकरदार.
......................................
फोटो ओळ:
गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्यातच नवीन बांधकामांचा राडारोडा, कचरा टाकला जातो. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा येतो तसेच अनारोग्याचे वातावरण निर्माण होते.