जलजन्य आजाराच्या रूग्णांची माहिती द्या; अन्यथा कारवाई, पुणे महापालिकेचा इशारा

By निलेश राऊत | Published: July 20, 2023 08:43 PM2023-07-20T20:43:16+5:302023-07-20T20:44:18+5:30

कॉलरा, जापनीज इन्सेफलायटीस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ, गॅस्ट्रोइंट्रायटीस, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, चिकनगुनियाचे रूग्ण वाढू लागले

inform patients of waterborne diseases; Otherwise action, warning of Pune Municipal Corporation | जलजन्य आजाराच्या रूग्णांची माहिती द्या; अन्यथा कारवाई, पुणे महापालिकेचा इशारा

जलजन्य आजाराच्या रूग्णांची माहिती द्या; अन्यथा कारवाई, पुणे महापालिकेचा इशारा

googlenewsNext

पुणे: शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तसेच क्लिनिक पॅथॅालॉजी लॅब यांनी त्यांच्याकडे उपाचारासाठी किटकजन्य व जलजन्य आजाराचा रूग्ण आला असल्यास त्यांची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला द्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, जलजन्य व किटकजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये कॉलरा, जापनीज इन्सेफलायटीस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ, गॅस्ट्रोइंट्रायटीस, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, चिकनगुनियाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे या रूग्णांची सखोल माहिती ( दवाखान्याचे नाव, रूग्णाचे नाव, वय, पत्ता, उपचार घेतल्याची तारीख, रिपोर्ट तारीख) pmckitak@gmail.com वर सादर करावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सदर माहिती वेळेत सादर न केल्यास किंवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास, संबंधितांवर महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ सुधारित तसेच साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बिनवडे यांनी सांगितले. 

Web Title: inform patients of waterborne diseases; Otherwise action, warning of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.