प्रशासनाकडे नाही बसस्थानकांची माहिती; स्थानकांवर पिण्याचे पाणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:59 AM2018-03-04T03:59:00+5:302018-03-04T03:59:00+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडे बसस्थानकांची तसेच त्यावरील सोयी-सुविधांची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. सुमारे ७५ बसस्थानकांपैकी प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली असून तीही अपुरी आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडे बसस्थानकांची तसेच त्यावरील सोयी-सुविधांची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. सुमारे ७५ बसस्थानकांपैकी प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली असून तीही अपुरी आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात सुमारे ७५ बसस्थानके असताना प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली आहे. इतर स्थानकांपैकी बहुतेक स्थानकांवर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी अशा मूलभूत सुविधा नाहीत. प्रवाशांना या सुविधा देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
शहरात अनेक वर्षांपासून सार्वजनिक बससेवा चालविणाºया पीएमपीकडे एकूण किती बसस्थानके आहेत, याची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे या स्थानकांवरील सुविधांबाबतही माहिती नाही, असे केसेकर यांनी सांगितले.
स्थानकांवर पिण्याचे पाणी?
पीएमपीचे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १३ आगार आहेत. या आगाराअंतर्गत जवळपास ७५ बसस्थानके आहेत. या स्थानकांबाबतची माहिती पीएमपी प्रवासी मंचचे रूपेश केसेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविली होती. त्यावर प्रशासनाने मनपा, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, गणपती माथा, महात्मा गांधी, हडपसर गाडीतळ, कात्रज, माळवाडी, कोथरूड, निगडी, भोसरी, पुणे स्टेशन, किवळे, मोलोदिना, अप्पर इंदिरानगर व खडकी बाजार या १६ स्थानकांची माहिती दिली आहे. या स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह (गणपती माथा वगळून) व विश्रांतीगृहाची व्यवस्था असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.