‘एज्युकेशन इन पुणे’ पुस्तकातून मिळणार शिक्षणप्रकल्पांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:17+5:302021-07-27T04:12:17+5:30
पुणे : सिद्धार्थ गुंदेचा यांनी संकलीत केलेल्या ‘एज्युकेशन इन पुणे’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या संग्राह्य पुस्तकात पुणे ...
पुणे : सिद्धार्थ गुंदेचा यांनी संकलीत केलेल्या ‘एज्युकेशन इन पुणे’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. या संग्राह्य पुस्तकात पुणे शहरातील १००० शिक्षणप्रकल्पांची परिपूर्ण माहिती असून पुण्यात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तकरूपी मार्गदर्शक आहे.
पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ तसचे ‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ असे ओळखले जाते. देशभरातील नव्हे तर अनेक परदेशी विद्यार्थीही येथे विविध प्रकारच्या शिक्षणासाठी येतात. मात्र या शिक्षण प्रकल्पांचा एकत्रित माहिती पुस्तकरूपाने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या अडचणी लक्षात घेऊनच गुंदेचा यांनी एक मार्गदर्शकपर पुस्तक तयार करण्याचे ठरवून तशी सर्व माहिती २८ दिवसांत संकलित केली आणि २२० पृष्ठांचे ‘एज्युकेशन इन पुणे’ हे इंग्रजीतील पुस्तक तयार झाले.
या पुस्तकात पुण्यातील सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमधील विविध शैक्षणिक प्रकल्पांची परिपूर्ण माहिती असून, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विजयकांत कोठारी, एस. के. जैन, वालचंद संचेती, ओमप्रकाश रांका, विजय भंडारी, पोपटलाल ओस्तवाल, अशोक पगारिया, प्रवीण चोरबेले, प्रदीप मुनोत, सुभाष परमार, सुभाषिता शेटे, पंकज कर्नावट, आदेश खिवंसरा, खुशाली चोरडिया, लाकीशा मर्लेचा, प्रीतेश मुनोत, गौरव नहार, विराज गेलडा, हर्षद गेलडा उपस्थित होते.
कोट
पुण्याला अव्वल बनविण्याची इच्छा
दर्जेदार शैक्षणिक शहरांच्या यादीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. या यादीत पुण्याला प्रथमस्थानी आणण्याची माझी इच्छा असून, यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल याची मला आशा आहे. या माहितीतून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा शिक्षणक्रम निवडणे सोपे जाणार आहे.
- सिद्धार्थ गुंदेचा, लेखक