वाईटाचीच माहिती वाऱ्यासारखी पसरते - गिरीष बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:04 AM2018-12-17T01:04:32+5:302018-12-17T01:05:19+5:30
गिरीश बापट : मोफत भोजनासाठी किचन ट्रस्ट
पिंपरी : समाजात चांगल्या कार्याची माहिती लवकर पोहचत नाही मात्र वाईट कार्याची माहिती वाºयासारखी पसरते. अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. रुग्णांना मोफत भोजन पुरविणाºया महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
अगरवाल फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बन्सल, उद्योजक प्रेमचंद मित्तल, अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुभाष बन्सल, भाजपा व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष सुधीर आगरवाल, रामअवतार अगरवाल, पन्नालाल गुप्ता, वेदप्रकाश गुप्ता, राजेश आगरवाल, महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल
बन्सल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘दुष्काळग्रस्त भागातील पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगरवाल समाजाने पुढाकार घ्यावा. व्यवहार कसा करावा हे अगरवाल समाजाकडून शिकावे. अगरवाल समाज सत्कारणी लागेल अशा उपक्रमावरच खर्च करतात.’’ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल, खजिनदार संजीव अगरवाल यांनी पुढाकार घेतला. के. एल. बन्सल यांनी सूत्रसंचालन केले. संजीव अगरवाल यांनी आभार मानले.
ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बन्सल म्हणाले, ‘‘अगरवाल समाजातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराजा अग्रसेन जयंतीच्या दिवसापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णांना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी एम. ए. हुसैन यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. आजतागायत चार हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.