शवासन करा अन् टेंशन घालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:18+5:302021-09-13T04:10:18+5:30
शवासनाची कृती- या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाच आत असायला हवी. ...
शवासनाची कृती- या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाच आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद हवेत. आपले सर्व लक्ष हृदयाच्या ठोक्यांवर हवं. मनात इतर कुठलाही विचार येऊ देऊ नये. शांत पडून राहावे. सर्व शरीर शिथिल करावे. काही विचार आले तरी येऊन जाऊ द्या. नंतर तुम्हाला एकदम शांत वाटेल आणि हळूहळू या आसनाची सवय झाली की मग हे आसन अजून चांगले जमायला लागेल.
आसनाचा फायदा- मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे. त्यामुळे दररोज हे आसन केल्यास खूप छान फायदा होईल. या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.