चंदूकाकांच्या विकासकामांचा वारसा संजय जगताप यांच्याकडे : खा. सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:06+5:302021-06-17T04:08:06+5:30

पुरंदर - हवेली मतदार संघातील विविध गावांत २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व बुधवारी ( दि. १६ ) ...

Inheritance of development work of Chandukaka to Sanjay Jagtap: Min. Supriya Sule | चंदूकाकांच्या विकासकामांचा वारसा संजय जगताप यांच्याकडे : खा. सुप्रिया सुळे

चंदूकाकांच्या विकासकामांचा वारसा संजय जगताप यांच्याकडे : खा. सुप्रिया सुळे

googlenewsNext

पुरंदर - हवेली मतदार संघातील विविध गावांत २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व बुधवारी ( दि. १६ ) खासदार सुळे यांच्या हस्ते, तर आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सासवड येथे नगर परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या २ कोटी २१ लाख रुपयांच्या ५४ दुकानांचे शॉपिंग मॉल, ५ कोटी ४२ लाख रुपये खर्चाचे सासवडच्या वीर पाणी योजनेच्या कांबळवाडी येथील पंपिंग स्टेशनवर सौरऊर्जा प्रकल्प आणि नवीन पंप उभारणे, १ कोटी ५० लाखांच्या २ नवीन पाणी साठवण टाक्या, तसेच शहरातील अंतर्गत १८ रस्ते आणि इतर विकास कामे अशा एकूण १३ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या कामांचा तसेच सासवड ग्रामीण रुग्णालयात प्रति मिनिट ५०० लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणीचा शुभारंभ यावेळी झाला. यावेळी संजय जगताप यांनी सासवडमध्ये नव्याने होत असलेल्या शाॅपिंग माॅलमुळे पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी १ कोटींची भर पडणार आहे. तसेच वीर पाणी योजनेसाठी कांबळवाडी पंपिंग स्टेशनवर उभारण्यात येत असलेल्या ४०० किलो वॉट सौरऊर्जा प्रकल्प आणि नवीन पंपांमुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्याबरोबर वीजबिलात दरवर्षी ६० लाख रुपयांची बचत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रास्ताविकातून कामांचा आढावा घेतला, तर नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जि प सदस्य प्रमोद काकडे, दत्ता झुरंगे, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, हेमंत माहूरकर, डॉ. दिगंबर दुर्गाडे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, नंदकुमार जगताप, यशवंतराव जगताप, सुनीता कोलते, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, गणेश जगताप, माउली यादव, पुष्कराज जाधव, उपनगराध्यक्षा वसुधा आनंदे, नगरसेविका पुष्पा जगताप, माया जगताप, मंगल म्हेत्रे, सारिका हिवरकर, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, मनोहर जगताप, संजय ग जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, बाळासो पायगुडे, संजय चौरे यांसह पालिकेचे विभागप्रमुख, सासवडकर नागरिक उपस्थित होते. संजय ग जगताप यांनी आभार मानले

सासवड येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित खा. सुप्रिया सुळे, आ. संजय जगताप, प्रदीप गारटकर, मार्तंड भोंडे, सर्व नगरसेवक व पदाधिकारी.

Web Title: Inheritance of development work of Chandukaka to Sanjay Jagtap: Min. Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.