लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:40+5:302021-04-09T04:10:40+5:30

मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोणा रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा ...

Initiative of Manchar Gram Panchayat to speed up vaccination | लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीचा पुढाकार

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीचा पुढाकार

Next

मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोणा रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मंचर गावच्या सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य हे स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत आहे. वाडीवस्तीवरील काही नागरिकांना वाहनाची व्यवस्था नाही. त्यांची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने वाहन उपलब्ध करून देऊन या नागरिकांना लसीकरणासाठी जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहन उपलब्ध झाल्याने नागरिक स्वतः मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन लसीकरण करून घेत आहेत. मंचर शहरांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. शासनाने तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले आहे.

०८ मंचर लसीकरण

मंचर ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघर जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Initiative of Manchar Gram Panchayat to speed up vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.