कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा झाडे देऊन सत्कार राष्ट्रतेज प्रतिष्ठानचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:08+5:302021-05-28T04:10:08+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना दिलासा देण्यासाठी माळशिरस येथे भूलेश्वर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या कोविड सेंटरला ...
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना दिलासा देण्यासाठी माळशिरस येथे भूलेश्वर कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या कोविड सेंटरला पुणे येथील साधु वासवाणी मिशनने मदत केली आहे. कोविड सेंटर मधून चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात येते. त्यांना माळशिरस गावातील राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या वतीने आंब्याचे रोप देऊन सन्मान केला जातो. हे रोप शेतातील बांधावर लावल्यानंतर एक आठवण म्हणूण चांगले जोपासले जाते व यातून वृक्षारोपणाचा संदेश दिला जात आहे आणि या झाडांपासून मोठ्या प्रमाणात सावली मिळते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते. माळशिरस येथील भूलेश्वर कोविड सेंटर सेंटरची पाहणी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केली. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, कै. तानाजी (आप्पा) यादव, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरस गावकामगार तलाठी सतीश काशीद, टेकवडी गावचे उपसरपंच सूरज गदादे, प्रवीण कदम, दादा यादव, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष बाळासाहेब गद्रे, माळशिरस प्राथमिक आरोग्य सेविका योगिता टिळेकर, आरोग्य सहायक सदाशिव कवितके, आशा सेविका निर्मला मोरे ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो ओळ - माळशिरस येथे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना झाडे देऊन सत्कार करताना पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत व इतर.