विकासकामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:19+5:302021-07-22T04:09:19+5:30

गावातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्वाचा --- शेलपिंपळगाव : खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना प्रामुख्याने समाजोपयोगी कामांना ...

The initiative of the villagers is important to complete the development work | विकासकामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्वाचा

विकासकामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्वाचा

Next

गावातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार महत्वाचा

---

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधत असताना प्रामुख्याने समाजोपयोगी कामांना प्राधान्या देऊन ती मार्गी लावली जात आहेत. विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेंच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्राप्त निधीतून गावातील विकासकामे पूर्णत्वास आणण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सर्वोतोपरी मदत व सहकार्य करावे असे आवाहन आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी केले.

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे पुणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, जेष्ठ विधिज्ञ ऍड. सुखदेव पानसरे, युवानेते मयुर मोहिते, ग्रामपंचायत सदस्य गणेश दौंडकर, नितीन मोहिते, अनिल पोतले, सागर पोतले, आशा मोहिते, सुनीता मोहिते, मंगल पोतले, सुनंदा औटी, संगीता गायकवाड, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, चेअरमन मधुकर दौंडकर, बजरंग मोहिते, उमेश मोरे, विलास मोहिते, काळूराम दौंडकर, शंकर मोहिते, संतोष गायकवाड, गोविंद दौंडकर, चंद्रकांत दौंडकर, रोहन मोहिते, तुषार मोहिते, निखिल मोहिते, विशाल दौंडकर, वैभव मोहिते, शरद मोहिते, आरती गोटमारे, अमित मोहिते आदिंसह बांधकाम विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावातील अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, समाज मंदिर व नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पोतलेवस्ती येथे अंगणवाडी खोलीच्या बांधकामासाठी अरूण पुराणीक व अंजली पुराणीक यांनी स्वतःच्या मालकीची एक गुंठा जागा बक्षीसपत्र करून दिल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विशाल दौंडकर यांनी केले. प्रास्ताविक सरपंच विद्या मोहिते तर उपसरपंच संदीप मोहिते व गणेश दौंडकर यांनी आभार मानले.

Web Title: The initiative of the villagers is important to complete the development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.