युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:43+5:302021-08-20T04:13:43+5:30

क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार अंतराळ शास्त्रज्ञ बनलेल्या बारामतीकर तरुणीचा उपक्रम -- बारामती : अंतराळ शास्त्रज्ञ बनलेल्या बारामतीकर तरुणीने ...

Initiatives to impart space sector lessons to the younger generation | युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार

युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार

Next

क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार

अंतराळ शास्त्रज्ञ बनलेल्या बारामतीकर तरुणीचा उपक्रम

--

बारामती : अंतराळ शास्त्रज्ञ बनलेल्या बारामतीकर तरुणीने देशातील युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे धडे देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. करिश्मा सलाउद्दीन इनामदार असे या तरुणीचे नाव आहे. जगात अंतराळ क्षेत्राची माहिती देण्यासाठी करिश्माने प्रथमच ऑनलाईन स्पेस कॅम्प सुरू केला आहे.

बारामती येथील एका सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर करिश्मा अंतराळ शास्त्रज्ञ बनली आहे. साहसी कल्पना चावलामुळे तिला स्फूर्ती मिळाली. लहानपणापासूनच तिचे अंतराळवीर शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न होते. याचा तिने कधी विसर पडू दिला नाही, त्यामुळे लहानपणापासूनच करिश्माचा 'स्पेस' प्रवास सुरू झाला. आयुकात जाऊन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तिने डिप्लोमा डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून केली. तिच्या वडिलांनी स्वत:चा प्लॉट विकून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. सप्टेंबर २०१४ मध्ये ती फ्रान्स येथील विद्यापीठात एम.एस.साठी रुजू झाली. इथे उच्च शिक्षण घेताना तिला जर्मनी, लुक्दोवर्ग, नेदरलँड्स, शिया आणि अजून ६ देशांत जाण्याची संधी मिळाली. अंतराळात जाण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळविण्यासाठी ती रात्रीचा दिवस करीत आहे. करिश्मा सध्या यूएसएमध्ये झायडायनामिक्स येथे आंतराळशास्त्रज्ञ, अंतराळ अभियंता म्हणून कार्यरत आहे. आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षातून देशातील बांधवांना करिश्माने ऑनलाईन स्पेस कॅम्पच्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे काम देशपातळीवर पोहोचविण्यासाठी करिश्माला राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेची गरज आहे.

परदेशात विद्यार्थ्यांसाठी फावल्या वेळात उच्च ध्येय गाठण्याची स्वप्नं मनावर बिंबवली जातात. त्यासाठी मोठ्या सायन्स ॲकॅडमी, स्पेस कॅम्प आदी संकल्पना राबविली जातात. त्याची सुमारे एक ते दीड लाख रुपये फी असते. आपल्याकडे असल्या प्रकारच्या सुविधा नाहीत. विद्यार्थ्यांना त्याची ओळख देखील नाही. केवळ इंजिनियर, डॉक्टर, वकील आदी शिक्षणाच्या मागे युवा पिढी धावते. नवीन संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.

या पार्श्वभूमीवर करिश्मा हिने तिची मैत्रीण युरोप (पोलंड) येथील मेकॅ ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या मार्ता पॅनकोवास्का सह ‘द नेक्स्ट स्पेस जनरेशन’च्या माध्यमातून ऑनलाईन स्पेस कॅम्प आयोजित केला. फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाचे अंतराळतज्ज्ञ प्रा. निमाह शॉ, ऑस्ट्रेलिया येथील ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट जेम्स बेव्हींग्टन, कॅलीफोर्नियाच्या स्पेस रोबोटिक्सच्या निमिषा मित्तल, भारतातील निर्मल गद्दे यांच्यासह करिश्माने हा स्पेस कॅ म्प आयोजित केला आहे. जुलै महिन्यात त्यासाठी २०० विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मिळविला होता. मात्र यामध्ये बारामती शहरासह भोर आणि पुण्यातील आदित्य बोधे, इशान चंपनेरकर, वरद पाटील, मंदार राजमाने, प्रसन्न चित्रगार, लायबा शेख, श्रेया श्रीराम, ज्ञानेश्वरी काळे, तनिष्का गावडे, श्रावणी शिंगाडे या १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये यावेळी विद्यार्थ्यांना आंतराळ शास्त्रज्ञ बनण्यासाठी कठीण प्रक्रियेतून जाण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मंगळ ग्रहावर जाण्याच्या कालावधीबाबतचे ‘असाईनमेंट’ देण्यात आले.

मंगळ ग्रहावर वादळ आल्यावर तोंड कसे देणार, मंगळावर घर कसे बनवणार, घराला लागणारे मटेरियल, पाणीपुरवठा, मंगळ गृहावर शरीरावर होणारे परिणाम आदी अवघड अशक्य असणारे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. अगदी आंतराळ शास्त्रज्ञ विचार करतात त्याचप्रमाणे आठ दिवस विचार करत विद्यार्थ्यांना त्या भूमिकेत ठेवण्यात आले. यामध्ये आंतराळवीर, आंतराळशास्त्रज्ञ, कमांडर आदी भूमिकेत विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले.

--

विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनियरभोवती घुटमळून चालणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवण्याची मानसिकता निर्माण करायला हवी. आजही देशात ए.पी.जे. अब्दुल कलाम, कल्पना चावला निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी भारतात टप्प्यप्प्प्याने काम हाती घेणार आहे.

- करिश्मा इनामदार

Web Title: Initiatives to impart space sector lessons to the younger generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.