बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:18+5:302021-04-28T04:10:18+5:30
‘मनसे’ची मागणी बारामती : बारामती शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालये ...
‘मनसे’ची मागणी
बारामती : बारामती शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास दबाव टाकत आहे. त्यामुळे बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी सक्ती व मागणी करणाऱ्या रुग्णालयांवर व डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे यांनी केली आहे.
बारामतीत दिवसात ४०० च्या आसपास कोविड पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. येथील सर्व खासगी रुग्णालये शासकीय रुग्णालये व कोविड आयसोलेशन सेंटर्स येथे उपचार चालू आहेत. अंदाजे ३५०० रूग्णांवर बारामती शहर व तालुक्यात उपचार चालू आहेत.त्यासाठी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार व बनावट इंजेक्शन तयार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून कठोर कार्यवाही करावी, आदी मागण्या अॅड. जावळे यांनी केल्या आहेत. गांभीर्यपूर्वक विचार करून तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा मनसेच्या वतीने उग्र स्वरूपाची आंदोलने करण्याचा इशारा जावळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विनोद जावळे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे कोरोना रुग्णांसाठी विविध मागण्या केल्या.
२७०४२०२१ बारामती—०५
——————————————————