केंद्र सरकारकडून लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:43+5:302021-04-13T04:10:43+5:30

राज्यात अनेक ठिकाणी लस पुरवठा खंडित झाल्याने लसीकरण बंद करण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णसंख्या देखील वाढत आहे. महाराष्ट्राची ...

Injustice in Maharashtra in distribution of vaccines by the Central Government | केंद्र सरकारकडून लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

केंद्र सरकारकडून लस वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

Next

राज्यात अनेक ठिकाणी लस पुरवठा खंडित झाल्याने लसीकरण बंद करण्यात येत आहे. यामुळे कोरोना रुग्णसंख्या देखील वाढत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना लसीचे डोस कमी प्रमाणावर दिले जात आहेत. मात्र इतर राज्यांना लोकसंख्या कमी असताना देखील लस वाटप मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यामुळे याचा निषेध युवासेनेकडून करण्यात आला. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण जास्त आहेत. तसेच याच राज्यात कोरोना लस तयार केली जात आहे. यामुळे केंद्राने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. तसेच रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे यावर केंद्र सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी युवासेनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस सूरज सानप, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप निंबाळकर, जिल्हा समन्वयक सागर नरले, तालुका अधिकारी सचिन इंगळे, गणेश गायकवाड, प्रतीक रायते, अशोक मंजुळकर, धनंजय खाडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Injustice in Maharashtra in distribution of vaccines by the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.