Pune Crime: ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या पॅराेलवरील सराइताला पकडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 09:17 IST2023-09-04T09:17:02+5:302023-09-04T09:17:27+5:30
व्हाॅटस्ॲपवर कॉल करून खंडणी नाही दिल्यास कुटुंबातील व्यक्तीला व फिर्यादीला जिवे मारण्याची देखील धमकी दिली होती....

Pune Crime: ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या पॅराेलवरील सराइताला पकडले!
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मे महिन्यात कात्रज हायवेवरील आर्यन स्कूलजवळ पाच ते सहा जणांनी कार अडवून, चाकूचा धाक दाखवून ५० लाखांची खंडणी मागितली होती. तसेच व्हाॅटस्ॲपवर कॉल करून खंडणी नाही दिल्यास कुटुंबातील व्यक्तीला व फिर्यादीला जिवे मारण्याची देखील धमकी दिली होती.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासावर असलेल्या दराेडा व वाहनचाेरी पथक एकमधील पाेलिस शिपाई श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, महेश पाटील यांना फरारी आरोपी पानशेत येथील त्याच्या गावी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठांना कळवून पानशेत येथील राहत असणाऱ्या गावी जाऊन आरोपी राेहित पासलकर (वय २३, रा. रुळे माेरदरी, ता. वेल्हे) याला त्याच्या घरी रात्री सव्वा वाजता पकडले. ही कारवाई दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, महेश पाटील यांनी केली.