पुण्यात रात्रीच्या वेळी दुकाने फाेडणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:29 PM2022-12-24T12:29:41+5:302022-12-24T12:30:38+5:30

या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली...

innkeepers who ransacked the shops at night were laughed at by the police | पुण्यात रात्रीच्या वेळी दुकाने फाेडणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुण्यात रात्रीच्या वेळी दुकाने फाेडणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

पुणे : रात्रीच्या वेळी बंद दुकानाचे शटर उचकटून चाेऱ्या करणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. विकास उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय २७, रा. पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली) आणि अजय चेलाराम राम (वय २०, रा. बाैद्धनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात केलेले ११ गुन्हे उघड झाले.

गुन्हे शाखा युनिट चारचे पथक गुरुवारी विश्रांतवाडी भागात पेट्राेलिंग करीत हाेते. त्यावेळी दुकानांत चाेरी करणारा सराईत गुन्हेगार जंगल्या कांबळे हा त्याच्या साथीदारासह आळंदी रस्त्यावर दर्ग्याजवळील बसथांब्यावर उभा आहे, अशी माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पाेलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, मनाेज सांगळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि दाेघांना ताब्यात घेतले.

आराेपींनी रात्रीच्या वेळी दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बंद दुकाने फाेडून चाेरी केल्याची माहिती तपासात दिली. पाेलिसांनी त्यांच्याकडील दुचाकी आणि चाेरलेली रक्कम असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या पाेलिस ठाणे हद्दीत केले गुन्हे

दुकान फाेडून चाेरी केल्याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, चतु:श्रृंगी, वाकड, चिंचवड, भाेसरी एमआयडीसी, चाकण, विश्रांतवाडी आणि विमानतळ पाेलिस ठाण्यात दाखल ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

चाेरलेल्या रकमेतून मुंबईत माैजमजा :

जंगल्या कांबळे आणि त्याचा साथीदार अजय राम हे दाेघे सराईत गुन्हेगार आहेत. दुकान फाेडून रक्कम चाेरायची. मुंबईत जाऊन महागड्या हाॅटेलमध्ये राहणे, जेवण करणे आणि माैजमजेसाठी खर्च केल्याचे पाेलिसांनी केलेल्या तपासातून निदर्शनास आले आहे.

Web Title: innkeepers who ransacked the shops at night were laughed at by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.