अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:19 PM2021-11-30T20:19:30+5:302021-11-30T20:20:01+5:30

अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे

Innocent release of a 25 year old man who demanded marriage by expressing love to a minor girl | अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता

googlenewsNext

पुणे : अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी हा आदेश दिला आहे.
       
मुलीनेही गाडीत बसण्यास विरोध केला नाही. तसेच, या प्रकरणात महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले नाहीत. यावरून आरोपीने अपहरण व विनयभंग केल्याचे सिध्द होत नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. तरूणाच्या वतीने न्यायालयात अँड. श्रीधर एस. हुद्दार यांनी बाजू मांडली. आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत ही घटना येत नाही. यावेळी त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले.

त्या मुलाने १७ वर्षीय मुलीला तिच्या वाढदिवसादिवशी कारमध्ये घेऊन जाऊन प्रेम व्यक्त केले व लग्नास मागणी घातली. यावरून भोसरी पोलिसांनी त्याच्याविरोधात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. वाढदिवसाच्या दिवशी आणि त्यापूवीर्ही त्याने प्रेम व्यक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. असा असा युक्तिवाद अँड हुद्दार यांनी केला. तो ग्राह्य धरीत तरूणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Web Title: Innocent release of a 25 year old man who demanded marriage by expressing love to a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.