इनोव्हा-दुचाकीचा अपघात, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:01+5:302021-04-10T04:11:01+5:30
याप्रकरणी अमोल रामभाऊ तिरमारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या ...
याप्रकरणी अमोल रामभाऊ तिरमारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीतील सहाणेमळा जवळ राहुल भीमराव अरबट(वय ३५ रा.नयावथोडा, ता.मोर्शी, जि. अमरावती) हे आपली मोटरसायकल क्रमांक (एम.एच. १४ - जे.जे. ६६५३) वरून पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या इनोवा या चारचाकी गाडीने (एम,एच.१४ ई. एच.७२८८) धडक दिली. या अपघातात राहुल अरबट गंभीर जखमी झाला होता. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून मंचर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातानंतर ईनोवा गाडी घेऊन चालक पंकज बाळासाहेब मेमाने (रा.मांजरी फार्म,सोलापूर रोड,पुणे) पळून गेला होता. स्थानिक नागरिक व तेथून जाणाऱ्या पत्रकारांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधून तात्काळ घटनेची माहिती दिली. मंचर पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्याने राजगुरुनगर येथील टोल नाक्यावर ईनोवा गाडी व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालकाने अपघात केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी इनोव्हा गाडीचा चालक पंकज बाळासाहेब मेमाने यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.