अजैविक ताण व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:32+5:302021-09-16T04:15:32+5:30
माळेगाव : येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘हिंदी दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय संविधान सभेने १४ सप्टेंबर ...
माळेगाव : येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘हिंदी दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय संविधान सभेने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा दिला गेला. या दिवसाच्या स्मृतीत दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिवस’ म्हणून भारतभर मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालकांनी ‘राजभाषा प्रतिज्ञा’ उपस्थित सदस्यांना दिली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मुधोजी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सविता नाईक- निंबाळकर यांनी ‘हिंदी साहित्याचा उद्भव व विकास’ या विषयावर प्रकाश टाकला. हिंदी भाषेने भारतीय संस्कृतीच्या जडण-घडणीमध्ये मोलाचे कार्य केल्याचे त्या म्हणाल्या.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. हिमांशू पाठक होते. संस्थेच्या राजभाषा अंमलबजावणी समितीच्या वतीने डॉ. वनिता साळुंखे, डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. विजयसिंह काकडे, डॉ. अविनाश निर्मळे आणि डॉ. परितोष कुमार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजभाषा समितीचे सदस्य डॉ. प्रवीण तावरे यांनी केले. या कार्यक्रमाद्वारे ‘हिंदी पखवाडा’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
निमचे संचालक डॉ. हिमांशू पाठक म्हणाले, संपूर्ण भारत देशात हिंदी भाषा नंबर एकवर बोलली जाते. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ‘निम’ प्रयत्नशील राहील.
माळेगाव येथे हिंदी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना संचालक डॉ. हिमांशू पाठक.
१५०९२०२१-बारामती-०४