नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : बेनके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:56+5:302021-08-18T04:14:56+5:30

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिपाऊस व वादळी वाऱ्यामुळे आदिवासी भागातील कोल्हेवाडी, खिरेश्वर, करंजाळे, ...

Inquire into the damage immediately: Benke | नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : बेनके

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा : बेनके

Next

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिपाऊस व वादळी वाऱ्यामुळे आदिवासी भागातील कोल्हेवाडी, खिरेश्वर, करंजाळे, खामगाव, शिरोली तर्फे कुकडनेर,घाटघर, येणेरे, खानगाव, सुकाळवेढे, तळेराण, कोपरे, मांडवे या भागात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत तसेच वादळामुळे महावितरणचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलही पडले आहेत. या वादळामध्ये माणिकडोह, अजनावळे, खामुंडी, कोपरे या भागातील अंगणवाडी,शाळा, समाज मंदिरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे व वादळाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. तसेच कोल्हेवाडी येथे भूस्खलन व खामगाव मांगणेवाडी येथील भूस्खलन बाबत सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. अतिपावसामुळे व वादळाने नुकसान झालेल्या परिसराची मी स्वतः अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केलेली असून जुन्नर तालुक्यातील अतिपावसाने व वादळाने नुकसान झालेल्या भागातील पंचनामे तत्काळ करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

Web Title: Inquire into the damage immediately: Benke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.