नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तत्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:55+5:302021-07-25T04:10:55+5:30
-- महुडे : भोर तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तत्काळ पंचनामे करून ...
--
महुडे : भोर तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्याला मदत करा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी भोरचे नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना दिले.
भोर तालुक्यात २५०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे व पिकांचे फार मोठे नुकसान झाले. भोर तालुक्यातील शेतकऱ्याचे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र, पावसामुळे त्यांचे पीक भुईसपाट झाले व मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती व पिकांचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
--
फोटो क्रमांक : २४ महुडे पावसाने नुकसान पंचनामा
फोटो - भोरचे निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे.
छाया - स्वप्निलकुमार पैलवान
240721\24pun_8_24072021_6.jpg
फोटो क्रमांक : २४ महुडे पावसाने नुकसान पंचनामा फोटो - भोरचे निवासी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे. छाया - स्वप्निलकुमार पैलवान