आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 15, 2024 16:10 IST2024-07-15T16:09:14+5:302024-07-15T16:10:23+5:30
मनी लॉड्रींगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले असल्याचेही सांगितले

आरबीआय कडून चौकशी; एकाची सहा लाखांची फसवणूक
पुणे : तुमचे नाव मनी लॉन्डरिंगच्या केसमध्ये आल्याने आरबीआयकडून तुमच्या बँक खात्याची चौकशी करायची आहे असे सांगून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापाराकरणी रविवारी (दि. १४) हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जून रोजी घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन करून तुमचे नाव मनी लॉन्डरिंगमध्ये आहे असे सांगण्यात आले. मनी लॉड्रींगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आले असल्याचेही सांगितले. त्यानंतर बँक खात्यातीळ संपूर्ण रक्कम दिलेल्या बँक खात्यात पाठवा. चौकशी करून तुम्हाला पुन्हा पाठवण्यात येईल असे सांगून ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलिया हे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोढवे करत आहेत.