Navale Bridge Accident | नवले अपघात प्रकरणात चौकशी समिती; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:52 AM2023-04-24T07:52:18+5:302023-04-24T07:53:32+5:30

जखमी व्यक्तींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या...

Inquiry Committee in Navale Accident Case; Information of Collector Rajesh Deshmukh | Navale Bridge Accident | नवले अपघात प्रकरणात चौकशी समिती; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांची माहिती

Navale Bridge Accident | नवले अपघात प्रकरणात चौकशी समिती; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांची माहिती

googlenewsNext

पुणे : मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची तीव्रता लक्षात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयात भेट देऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली. जखमी व्यक्तींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, ‘ससून’चे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिलेश हराळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश चापे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, होणाऱ्या अपघाताची कारणे व त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे.

समितीत असतील काेण?

या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Inquiry Committee in Navale Accident Case; Information of Collector Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.