अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी महापालिकेत गावे समावेशासाठी आग्रही : मुळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:27+5:302020-12-22T04:10:27+5:30
पुणे : पुणे महापालिका हद्दीत २३ गावांच्या समावेशाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता ...
पुणे : पुणे महापालिका हद्दीत २३ गावांच्या समावेशाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता असूनही सर्वच गावे विकासापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे आपले अपयश लपविण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत गावे समावेशासाठी आग्रही आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे़
महापालिकेत समावेश करण्यात येणाऱ्या प्रस्तावित २३ गावांतील ग्रामस्थांची याबाबतची भूमिका, नागरी समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी मुळीक या गावांना भेट देऊन संवाद साधत आहेत़ यावेळी मुळीक यांनी भाजप संबंधित गावातील ग्रामस्थांच्या भूमिकेबरोबर कायम राहिल असे आश्वासन दिले़
शेवाळेवाडी येथे बोलताना मुळीक यांनी, कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता गावांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगितले़
------------------------------