वानवडी रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By admin | Published: April 27, 2017 05:10 AM2017-04-27T05:10:55+5:302017-04-27T05:10:55+5:30

वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ मधील रस्त्यावर काही संस्थांकडून निर्माण केल्या जात असलेल्या अडथळ्यांची स्थानिक नगरसेवकांसमवेत

Inspection by the authorities of Wanwadi Road | वानवडी रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

वानवडी रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

पुणे : वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ मधील रस्त्यावर काही संस्थांकडून निर्माण केल्या जात असलेल्या अडथळ्यांची स्थानिक नगरसेवकांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हा रस्ता मोठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन करून रस्ता रुंद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या रस्त्याचा काही भाग राज्य राखीव पोलीस दलाच्या जागेतून जातो. गेली अनेक वर्षे रस्ता व्यवस्थित सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य राखीव पोलीस दलाने रस्त्याच्या त्यांच्या भागातून जाणाऱ्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले. त्यामुळे रस्ता बंद झाला. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक धनंजय घोगरे यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी यासंबधी पालिकेत माहिती घेतली. त्यावेळी रस्त्याचा काही भाग राज्य राखीव पोलीस दलाचा असल्याचे समजले.
घोगरे यांच्या तक्रारीवरून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी व अन्य काही अधिकाऱ्यांनी मंगळवारी या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतर करण्याबाबत राज्य राखील पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणी करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेकडून ही जागा ताब्यात घेऊन रस्ता रुंद केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Inspection by the authorities of Wanwadi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.