तहसीलदारांकडून भीमाशंकर मंदिराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:34+5:302021-07-24T04:09:34+5:30
आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा वाढला ...
आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा वाढला परंतु बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाने अक्षश: थैमान घातले. यामध्ये बुधवारी संध्याकाळपासुन श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसरामध्ये ढगफुटी होवुन वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये भीमा नदी उगम स्थानापासुन त्याच प्रमाणे मंदीर परिसर पायऱ्यांवरुन पाणी मोठ्या प्रमाणात भीमापात्रामध्ये आले. परंतु सध्या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम पुरातत्व विभागाकडुन सुरू असल्यामुळे मंदिराच्या आवती भोवती संपुर्ण राडारोडा पडला आहे. यामुळे मंदीराच्या आजुबाजुला साचलेले पाणी गोमुखातुन आतमध्ये शिरुन शिवलिंग देखील पाण्याखाली गेल्याचे पहाणी दरम्यान तहसिलदार यांना आढळले.
चौकट
बाराज्योर्तिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसर हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेर घर समजले जाते. परंतु आज तागायत मंदीर परिसर व गाभाऱ्यातील शिवलिंग देखील पाण्याखाली गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. भीमाशंकर परिसरामध्ये बुधवारी दुपार पासुन ढगफुटीस सुरुवात होवुन मुसळधार पाऊस पडु लागला. मंदीराभोवती असलेल्या डोंगर उतारावरील पाणी, पायऱ्यांवरील पाणी त्याच प्रमाणे भीमानदी उगमस्थावरुन येणारे पाणी नदी पात्रातुन मंदीर परिसरामध्ये आले. मंदीर परिसरामध्ये आजुबाजुला पडलेल्या राडारोड्याचा अडथळा पाण्याला होवुन मंदीर गाभाऱ्यामधुन शिवलिंगास अभिषेक केल्यानंतर ज्या गोमुखातुन पाणी बाहेर काढले जाते त्याच गोमुखातुन पाणी आतमध्ये शिरुन शिवलिंगाभोवती साचले असल्याचे जेष्ठ विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या वेळी विश्वस्त दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर, भीमाशंकर भोरगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय हिले, उपरपंच गोरक्ष कौदरे, आषिष कोडीलकर, देवस्थानचे सचिव अशोक काशिद, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे उपस्थित होते.
चौकट
भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त व कर्मचारी यांनी संपुर्ण गाभारा साफ करुन पाणी बाहेर काढले. आता संपुर्ण मंदीर परिसर मोकळा झाला आहे.
सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमानदी पात्र खचुन मोठे नूकसान झाले आहे. त्याच प्रमाणे पायऱ्यांची संरक्षण भिंती तुटली आहे.
फोटो मचकुर: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुसकानीची पहाणी करताना खेडच्या तहसिलदार तथा भिमाशंकर देवस्थान कार्यकारी विश्वस्त डाॅ.वैशाली वाघमारे व जेष्ठ सहकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे