आंबेगावमधील धोकादायक गावांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:31+5:302021-07-26T04:10:31+5:30

मागील दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहे. जांभोरी, काळवाडी, पोखरी बेंढारवाडी, ...

Inspection of dangerous villages in Ambegaon | आंबेगावमधील धोकादायक गावांची पाहणी

आंबेगावमधील धोकादायक गावांची पाहणी

Next

मागील दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहे. जांभोरी, काळवाडी, पोखरी बेंढारवाडी, फुलवडे भगतवाडी, माळीण पसारवाडी व आसाणे या पाच धोकादायक गावांमधील लोक भितीच्या सावटा खाली आहेत. या गावांना सारंगकोडोलकर, सभापती संजय गवारी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदुबाई लोहकरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपअभियंता सुरेश पटाडे, कॉलेज आॅफ इंजिनीअरींगचे यशवंत कोळेकर तसेच संबंधीत गावाचे तलाठी, ग्रामसवेक यांनी भेटी देवून चर्चा केली.

आदिवासी भागातील काहि गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दरडी पडल्याने संपर्क तुटला आहे. हे रस्ते तात्काळ खुले करावेत. धोकादायक गावांमधील लोकांशी चर्चा करून पाऊस पडत असलेल्या दिवसांत त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करावे, कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सरपंच व गावातील प्रमुख लोकांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा व जागा उपलब्ध असल्यास येत्या गुरूवारी घोडेगाव येथे चर्चेसाठी यावे, जागा निश्चीत झाल्या बरोबर शासनाकडून घरे, रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा येथे पुरवल्या जातील असे सारंग कोडोलकर यांनी सांगितले.

चौकट

पाच गावांपैकी फुलवडे भगतवाडी, माळीण पसारवाडी या दोन गावांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चीत झाली नाही. तर जांभोरी काळवाडी, पोखरी बेंढारवाडी या गावांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध झाली असून घरांसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले आहे यामध्ये उचीत कारवाई करावी अशी मागणी यावेळी सभापती संजय गवारी यांनी केली.

25072021-ॅँङ्म-ि02 - माळीण पसरावाडी या धोकादायक गावाची पहाणी करताना प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, सभापती संजय गवारी व इतर

Web Title: Inspection of dangerous villages in Ambegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.