कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:08+5:302021-03-27T04:11:08+5:30

यावेळी सूस ग्रामपंचायतच्या उपसरपंच दिशा ससार, अनिल ससार, माजी उपसरपंच नारायण चांदेरे, विद्यमान ग्रा. सदस्य गजानन चांदेरे , पुणे ...

Inspection of low pressure water supply | कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत पाहणी

कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत पाहणी

Next

यावेळी सूस ग्रामपंचायतच्या उपसरपंच दिशा ससार, अनिल ससार, माजी उपसरपंच नारायण चांदेरे, विद्यमान ग्रा. सदस्य गजानन चांदेरे , पुणे मनपाचे पाणीपुरवठा अभियंता मुकुंद लंगरवाडे, कनिष्ठ अभियंता योगिता भामरे, प्रीतम कसबे उपस्थित होते.

सूस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये गेले काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागत असून योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या त्रासामध्ये भर पडली आहे.

पाषाण-बाणेर-बालेवाडी यांना पाणी पुरवठा करणार्या पाईप लाईन्सवर फ्लोव मिटर्स बसवून या भागाला होणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्याची (किती एमएलडी पाणीपुरवठा होतो याची) माहिती देण्याच्या सूचना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केल्या.

------------------

फोटो : बाणेर बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा संदर्भामध्ये पाण्याच्या टाकीवर जाऊन पाहणी करताना नगरसेवक अमोल बालवडकर ग्रामस्थ व अधिकारी.

Web Title: Inspection of low pressure water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.