नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 03:45 AM2016-01-10T03:45:43+5:302016-01-10T03:45:43+5:30

नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सलग आठव्या दिवशीदेखील सुरूच असून, या दप्तरतपासणीसाठी १० अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे़ तपासणी काटेकोरपणे सुरू असल्याने

The inspection of Narayangaon Gram Panchayat has already started | नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सुरूच

नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सुरूच

Next

नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी सलग आठव्या दिवशीदेखील सुरूच असून, या दप्तरतपासणीसाठी १० अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे़ तपासणी काटेकोरपणे सुरू असल्याने ग्रामपंचायत अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीचे ४ ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे अडचणीत येणार, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे़ नारायणगाव ग्रामपंचायतीची दप्तरतपासणी दि़ २९ डिसेंबर २०१५पासून सुरू आहे़ प्रथम ४ विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तरतपासणी सुरू करण्यात आली होती़ त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून १० विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तरतपासणी सुरू करण्यात आली़ शुक्रवारपासून १० विस्तार अधिकाऱ्यांसह आणखीन ५ मदतनीस यांच्यासह ही दप्तरतपासणी सुरू करण्यात आली. यासाठी २००८-०९पासून करण्यात येत असल्याने या कालावधीमधील ४ ग्रामविकास अधिकारी अडचणीत येऊ शकतात. ग्रामपंचायतीला वाचविण्याचा प्रयत्न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक रत्नपारखी व राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार दीपक खैरे यांनी केली आहे़

Web Title: The inspection of Narayangaon Gram Panchayat has already started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.