भुगाव ग्रामपंचायतीच्या कामाची राज ठाकरेंकडून पाहणी;पुणे दौऱ्यावर असताना दिली अचानक भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 09:43 PM2023-08-22T21:43:07+5:302023-08-22T21:45:17+5:30
याप्रसंगी सरपंच वैशाली महेश सणस, उपसरपंच दिनेश सुर्वे भुगाव गावातील विविध विकास कामांची माहिती दिली.
-प्रदीप पाटील
पुणे- सातत्याने विविध व आनोखे उपक्रम राबवीणारी पुणे जिल्ह्यातील आगळी वेगळी ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण केलेल्या भुगाव ग्रामपंचायतीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना सदिछा भेट देऊन भुगावकराना सुखद धक्का दिला.
पुणे ते दिघी बंदर हा राष्ट्रीय महामार्ग भूगाव गावठाण हद्दीतून जातो. ह्या महामार्गाचे काम जवळ जवळ 90 टक्के पूर्ण झाले असून भुगाव गावठाणातील मुख्य रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. उर्वरित रस्ता करावा ह्यासाठी ग्रामपंचायत भुगाव मार्फत अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एमएसआरडीसी ह्यांच्या कडून काही प्रतिसाद येत नव्हता म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक व्यवसायिकांच्या मदतीने व लोक वर्गणीतून केलेल्या रस्त्याच्या कामाची देखील पाहणी ठाकरे यांनी केली.
याप्रसंगी सरपंच वैशाली महेश सणस, उपसरपंच दिनेश सुर्वे भुगाव गावातील विविध विकास कामांची माहिती दिली आणि मा उपसरपंच राहुल आबा शेडगे व मा. सरपंच निकीता सणस यांनी भविष्यातील स्वप्नातील भुगाव या कल्पनेतील ब्युलप्रिंटची माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मा नगरसेवक किशोर शिंदे. अजित इंगवले,जीवन कांबळे, मा. सरपंच अर्चना सुर्वे,मा. उपसरपंच विशाल भिलारे, मा. उपसरपंच संकेत कांबळे,अमित घारे, सुनिता चोंधे, बाळासाहेब चोंधे,ग्रामविकास अधिकारी माने आदी उपस्थित होते.
राज ठाकरेनी भेट दिली दिलेली भुगाव ठरली पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत..
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून बहुतांशी वेळा शहरी भागात अधिक संपर्क असलेले राज ठाकरे यांना बहुदा ग्रामीण भागात जाण्यास वेळ कमी मिळतो. तरीही ते महत्वाच्या समस्यावेळी त्याठिकाणी पोहचत असतात. एखाद्या ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेणारी भुगाव ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली असल्याने येथील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.