बावधनमध्ये होणाऱ्या प्रांत कार्यालयाच्या जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:22+5:302021-03-16T04:11:22+5:30
बावधन येथे मावळ व मुळशीचे प्रांत कार्यालयासाठी तीन कोटी ३४ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. तेव्हा बावधन येथे होणाऱ्या ...
बावधन येथे मावळ व मुळशीचे प्रांत कार्यालयासाठी तीन कोटी ३४ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. तेव्हा बावधन येथे होणाऱ्या या कार्यालयाच्या जागेची पाहणी थोपटे यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के,तहसीलदार अभय चव्हाण,संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे,ग्रामपंचायत सदस्य बापू दगडे,राष्ट्रवादीचे सुहास दगडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे,दादाराम मांडेकर मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे,माजी सरपंच नंदकुमार दगडे,निलेश दगडे,मधुर दाभाडे,सचिन भुंडे उपस्थित होते.
प्रांत कार्यालयाला आमचा विरोध नाही,मात्र प्रांत कार्यालय उभारत असताना या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदानाची जागा राखीव ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थानी व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली.
याप्रसंगी थोपटे म्हणाले की,सध्या महिला बालकल्याण आयुक्त कार्यालयाकडे असणारी जागा निवडणुक आयोगाला देण्यासाठी प्रस्ताव आहे. तो बदलून त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी मागणी करता येईल. तेव्हा या संदर्भातील मागणीचे निवेदन तयार करावे आणि आपण याविषयी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना समक्ष भेटू.
-----------------------
फोटो ओळ : बावधन येथे नव्याने होत असलेल्या प्रांत कार्यालयाच्या जागेची पाहणी आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने करण्यात आली.