निमगावा म्हाळुंगीतील यशस्वी सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:34+5:302020-12-24T04:11:34+5:30

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत मंडळ कृषी अधिकारी कार्यालय शिक्रापूर यांच्या वतीने मेघराज वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बचत ...

Inspection of successful organic farming project at Nimgawa Mahalungi | निमगावा म्हाळुंगीतील यशस्वी सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी

निमगावा म्हाळुंगीतील यशस्वी सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी

Next

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत मंडळ कृषी अधिकारी कार्यालय शिक्रापूर यांच्या वतीने मेघराज वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून विनाअनुदानित सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात आला आहे.

या सेंद्रिय शेती प्रकल्पाची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी मंडल कृषी अधिकारी धनंजय हिरवे, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, माजी सरपंच व सेंद्रिय शेतीची अंमलबजावणी करणारे शेतकरी राजेंद्र विधाटे तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

प्रकल्पात सेंद्रिय हरभरा, सेंद्रिय कांदा, सेंद्रिय टोमॅटो, सेंद्रिय रब्बी ज्वारी,या पिकांची पिक प्रात्यक्षिके घेण्यात आली असून मंडल कृषि अधिकारी धनंजय हिरवे यांनी वरील पिक प्रात्यक्षिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व, विविध पिकांवरील किडरोग नियंत्रण , सेंद्रिय औषधांचा वापर,चिकट सापळे,सापळा पिके,पक्षी थांबे, जैविक किटकनाशकांचा वापर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

राजेंद्र विधाटे यांच्या एकात्मिक शेती विकास प्रकल्पाची पाहणी केली यामध्ये डाळ मिल, शेवई उत्पादन, मसाला प्रक्रिया, बेसन पिठ उत्पादन, मुक्त संचार गोठा, गांडुळ खत प्रकल्प, बांधावरील फळबाग लागवड, परसबागेतील फळबाग, भाजीपाला,औपधी व सुगंधी वनस्पती लागवड, चारा पिके, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब ,जिवामृत निर्मिती, वेस्ट डिकंपोजरचा वापर, मिल्कींग मशीन, देशी कुक्कुटपालन, शेळीपालन, सौरऊर्जा संयंत्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सदर प्रकल्पास तालुका कृषि अधिकारी सतीश केळगंद्रे यांनीही मार्गदर्शन केले.

--

फोटो : २३ रांजणगाव गणपती सेंद्रीय शेती पाहणी

फोटो : निमगाव म्हाळुंगी ( ता.शिरूर) येथे सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी करताना कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मेघराज वाळुंजकर आदी

Web Title: Inspection of successful organic farming project at Nimgawa Mahalungi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.