शिवरायांच्या युद्धनीतीने लष्कराला मिळते प्रेरणा

By admin | Published: February 21, 2015 10:46 PM2015-02-21T22:46:00+5:302015-02-21T22:46:00+5:30

लढाया जिंकल्या असुन जगभरातील लष्करी सैनिकांना आजही शिवरायांच्या युद्धनितीने प्रेरणा मिळत असल्याचे निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनात बोलताना सांगीतले.

The inspiration of the army is achieved by the battle of Shivrajaya | शिवरायांच्या युद्धनीतीने लष्कराला मिळते प्रेरणा

शिवरायांच्या युद्धनीतीने लष्कराला मिळते प्रेरणा

Next

खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ‘गनिमी कावा’ या युद्धनितीतंत्राने मोघल सैन्याला शेवटपर्यंत झुंजवुन अनेक लढाया जिंकल्या असुन जगभरातील लष्करी सैनिकांना आजही शिवरायांच्या युद्धनितीने प्रेरणा मिळत असल्याचे निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनात बोलताना सांगीतले.
गोनिदां दुर्गप्रेमी मंडळातर्फे किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रात पाचवे दुर्गसाहाहित्य संमेलन शुक्रवारी सुरु झाले. संमेलनाच्या आजच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्राला सकाळी दुर्गभ्रमण मोहिमेने सुरुवात झाली. पहिल्या सत्रात शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ या विषयावर निवृत्त महाजन यांचे व्याखान झाले.
त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरें, शुर सेनानी नावजी बलकवडे व लोकमान्य टिळकांच्या वारसदारांचे उपस्थितीत एक परिसंवाद आज पार पडला. त्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संध्याकाळचे सत्रातील मुलाखतीने संमेलनाच्या दुस-या दिवशीचे कार्यक्रमाने उपस्थितीत गडप्रेमी व दुर्गप्रेमींची मने जिंकुन घेतली.
महाजन म्हणाले, जगातील लष्कराकडून आज विविध ठिकाणी लष्करी मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या जात असल्याचे सांगून तशी उदाहरणे दिली. अमेरिकन लष्कराने अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू ओसामा बिद लादेनला ज्या पद्धतीने संपविले ती अमेरिकन लष्कराची यशस्वी मोहीमसुद्धा ़छत्रपतींच्या या
गणिमी कावा या युद्धतंत्राचाच
एक भाग होता.
शाहिस्तेखानावरचा महाराजांनी केलेला हल्ला हा चीन बरोबरच्या युद्धाचे एका मोहीमेत यशस्वीपणे भारतीय लष्काराने राबविला असल्याचे महाजन यांनी निदर्शनास आणुन दिले. (वार्ताहर)

वंशजांचा
परिसंवाद रंगला
आजच्या दुपारच्या सत्रात सिंहगडचे वारस या विषयावर झालेल्या परिसंवादात सुभेदार तानाजी मालुसरेंच्या चौदाव्या पिढीतील वंशज शितल मालुसरे, नावजी बलकवडे यांचे वारस स्वता: पांडुरंग बलकवडे व लोकमान्य टिळकांचे सिंहगडावरील वास्तव्याचा काळ व सिंहगडाशी असलेले नाते या याबद्द्ल त्यांच्या वंशल नगरसेविका मुक्ता टिळक यांनी या परिसंवादात भाग घेतला होता. इतिहास तज्ञ पांडुररंग बलकवडे यांनी तानाजी मालुसरें यांनी ऐतिहासिक कोळीवाड्यावर घातलेला जागरण गोंधळ,त्या नंतर गडावर केलेली चढाई व तेथे झालेले घनघोर युद्धातील प्रसंग मांडले. मालुसरेंच्या वंशज शितल मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडुन भोसले घराण्यातील त्यांची कवड्याची मिळाले ती माळ आणली होती.

Web Title: The inspiration of the army is achieved by the battle of Shivrajaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.