स्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकरांचे स्मरण प्रेरणादायी : शेडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:35+5:302021-08-28T04:13:35+5:30
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भीमातील भांडवलकर कुटुंबीयांनी मोठे योग दिले होते. यात वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्यसंग्रमात दौलती नाईक ...
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भीमातील भांडवलकर कुटुंबीयांनी मोठे योग दिले होते. यात वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्यसंग्रमात दौलती नाईक यांचा मोठा वाटा होता. तर महात्मा गांधीजींनी उभारलेल्या आंदोलनात मारुती भांडवलकर यांनी भाग घेतला होता. या त्यांच्या कार्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी ताम्रपट देत गौरव केला होता. त्यांची स्मृती जागवत कोरेगाव भीमाकरांनी एकत्र येत स्वातंत्र्य सेनानी स्व. मारुती भीमजी भांडवलकर यांची पुण्यतिथी स्वातंत्र्य सेनानी स्व. मारुती भीमजी भांडवलकर प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्वातंत्र्य लढ्याचे पुन्हा स्मरण करण्यात आले.
या वेळी स्वातंत्र्यसेनानी स्व. मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाचे पूजन शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तसेच जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी विठ्ठलराव ढेरंगे, पी. के. गव्हाणे, नारायणराव फडतरे, कैलासराव सोनवणे, अनिल काशिद, अशोक गव्हाणे, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, अशोक काशिद, विक्रमराव दौंडकर, केशवराव फडतरे, महेश ढेरंगे, विक्रम गव्हाणे, अनिकेत गव्हाणे, संपत गव्हाणे, बबूशा ढेरंगे, रमेश भंडलकर, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले उपस्थित होते.
स्मारकाला जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार व पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांनीही अभिवादन केले. या वेळी कुसूम मांढरे यांनी स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकांमुळे आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो ही आपल्या दृष्टीने गौरवास्पद असल्याचे सांगितले. स्वागत बापू भांडवलकर यांनी तर, सूत्रसंचालन मधुकर कंद यांनी केले. सुरेंद्र भांडवलकर यांनी आभार मानले.
२७ कोरेगाव भीमा
स्वातंत्र्यसेनानी स्व. मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन करताना मान्यवर.