नटसम्राटाच्या कौतुकाच्या थापेने प्रेरणास्नेत
By admin | Published: December 9, 2014 11:53 PM2014-12-09T23:53:09+5:302014-12-09T23:53:09+5:30
थरथरत्या हातांनी उमेदीतल्या कलाकारांना सन्मानित केलं. नटसम्राटाची कौतुकाची थाप.. म्हणजे प्रेरणास्नेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Next
पुणो : थरथरत्या हातांनी उमेदीतल्या कलाकारांना सन्मानित केलं. नटसम्राटाची कौतुकाची थाप.. म्हणजे प्रेरणास्नेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा सर्व भावनिक क्षण सगळे सभागृह अनुभवत होता.
रूपवेध प्रतिष्ठानकडून यंदा तन्वीर पुरस्कार न देता ‘नाटक कंपनी’ या संस्थेला पुरस्काराची रक्कम देण्यात आली. लेखक धर्मकीर्ती सुमंत व दिग्दर्शक आलोक राजवाडे यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात आली. या वेळी या नव्या दमाच्या रंगकर्मीच्या ‘बिनकामाचे संवाद’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर श्रीराम आणि दीपा लागू यांचा धाकटा मुलगा तन्वीर याचा 1994 मध्ये रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वीरच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याच्या जन्मदिनी तन्वीर सन्मान पुरस्कार देऊन 2क्क्4 पासून अनेक रंगकर्मीना सन्मानित करण्यात आले. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच नाटय़ क्षेत्रत भरीव कामगिरी करत असलेल्या अलोक व धर्मकीर्ती सुमंत यांच्या नाटक कंपनी संस्थेला ही रक्कम देण्यात आली. तन्वीर सन्मान पुरस्काराला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे स्वरूप बदलत असल्याचे दीपा लागू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रगल्भ पिढीचा हात धरत नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. त्यामुळेच पुरस्काराचे स्वरूप बदलले आहे.
- दीपा लागू, कार्यवाह, रूपवेध प्रतिष्ठान