‘ती’च्यापासून ‘त्यांनी’ घेतली प्रेरणा

By admin | Published: September 9, 2016 01:39 AM2016-09-09T01:39:32+5:302016-09-09T01:39:32+5:30

लोकमत’च्या ‘ती’चा गणपती या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन, बारामती शहरातील तांदूळवाडी वेस येथे ४० महिलांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी यशस्विनी महिला गणेश मंडळाची स्थापना केली.

Inspired by 'She' taken from 'She' | ‘ती’च्यापासून ‘त्यांनी’ घेतली प्रेरणा

‘ती’च्यापासून ‘त्यांनी’ घेतली प्रेरणा

Next

बारामती : ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन, बारामती शहरातील तांदूळवाडी वेस येथे ४० महिलांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी यशस्विनी महिला गणेश मंडळाची स्थापना केली. बारामती तालुका आणि शहरातील हे एकमेव महिला गणेश मंडळ आहे. फक्त दहा दिवस गणपती बसवण्यापुरतेच हे मंडळ मर्यादित राहिले नाही, तर सामाजिक जाणीव जपत या मंडळाने आपला वेगळा ठसादेखील उमटवला आहे.
गणेशोत्सव म्हटले, की तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येते. बहुतांश मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये पुरुष कार्यकर्तेच असतात. महिलांचा सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सहभाग तसा कमीच असतो. तर काही ठिकाणी महिला केवळ आरती आणि कार्यक्रमांसाठी तात्पुरती हजेरी लावतात. मात्र, चराचरांत आनंद आणि उत्साह भरणाऱ्या या उत्सवामध्ये बारामतीच्या यशस्वीनी महिला गणेश मंडळाच्या महिला हिरीरीने सहभागी झाल्या, नुसत्या सहभागी झाल्या नाहीत, तर त्यांच्या उत्साहाला व उत्सवालाही विधायक स्वरूप देत आज बारामती शहरामध्ये आपली वेगळी ओळखही या महिला गणेश मंडळाने जपली आहे.
सण साजरा करायचा, तर त्यामध्ये तळागाळातील प्रत्येकाला सामावून करावा, आनंद वाटल्याने वाढतो. हे तत्त्व अंगिकारत मंडळ मार्गक्रमण करीत आहे. या मंडळाने पुणे येथील भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने डोळे तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियादेखील करणार आहे, असे मंडळाच्या अनिता गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Inspired by 'She' taken from 'She'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.